Ad will apear here
Next
२१ ऑक्टोबरला पुण्यात ७५ जादूगारांच्या जादूचा आविष्कार
चंद्रशेखर चौधरी यांचा ७५ जादूगारांच्या हस्ते होणार सत्कार
चंद्रशेखर चौधरी

पुणे :
पुण्यातील ज्येष्ठ जादूगार चंद्रशेखर चौधरी यांच्या पंच्याहत्तरीनिमित्त २१ ऑक्टोबर रोजी ७५ जादूगारांच्या हस्ते त्यांचा सत्कार केला जाणार आहे. हे सर्व जादूगार या वेळी आपल्या जादूचा आविष्कार दाखवणार आहेत. यामध्ये परदेशातील चार जादूगारांचा समावेश आहे. 

‘सोसायटी ऑफ इंडियन मॅजिशियन्स’ या संस्थेने या जीवनगौरव सोहळ्यासाठी पुढाकार घेतला आहे. हा सोहळा पुण्यातील पीवायसी जिमखान्यात २१ ऑक्टोबर रोजी सायंकाळी सहा वाजता होणार आहे. पीवायसी जिमखान्याच्या सहकार्याने होणाऱ्या या कार्यक्रमाला जिमखाना सदस्य उपस्थित राहणार आहेत. ‘सोसायटी ऑफ इंडियन मॅजिशियन्स’चे अध्यक्ष भूपेश दवे (मुंबई) यांच्या हस्ते चंद्रशेखर चौधरी यांचा सत्कार करण्यात येणार आहे. 

चंद्रशेखर चौधरी१९६१ साली पुण्यात जादूचा पहिला प्रयोग करणाऱ्या चंद्रशेखर चौधरी यांनी देशभरात, देशाबाहेर हजारो प्रयोग केले. बल्ब निर्मिती करणारे उद्योजक असतानाही चौधरी यांनी जादूगार म्हणूनही यशस्वी कारकीर्द केली. इंटरनॅशनल मॅजिक स्टार, लाइफटाइम अचिव्हमेंट अॅवॉर्ड असे अनेक पुरस्कार त्यांना मिळाले आहेत. पुण्यातील मॅजिशियन्स असोसिएशन या संस्थेच्या स्थापनेत त्यांचा सहभाग होता. जादूगारांची पुण्यात अधिवेशने आयोजित करण्यात त्यांनी पुढाकार घेतला होता. त्यांच्या या क्षेत्रातील योगदानाचा सन्मान २१ रोजी केला जाणार आहे. 

 
Feel free to share this article: https://www.bytesofindia.com/P/NZVECF
Similar Posts
७५ जादुगारांच्या कलाविष्काराने पुणेकर मंत्रमुग्ध पुणे : देशभरातील आणि परदेशातील चार अशा एकूण ७५ जादुगारांच्या जादूचा आविष्कार पुणेकरांनी अनुभवला. ज्येष्ठ जादूगार चंद्रशेखर चौधरी यांच्या पंच्याहत्तरीनिमित्त या ७५ जादुगारांच्या हस्ते त्यांचा सत्कार करण्यात आला.
आदिवासी निर्मित पर्यावरणपूरक दिवे, कंदील यांचे प्रदर्शन पुणे : देशभरातील आदिवासी आणि ग्रामीण कलाकारांनी तयार केलेले पर्यावरणपूरक दिवे, आकाशकंदील, लामणदिवे, तसेच दिवाळीसाठी भेटवस्तू आणि गृह सजावटीच्या अनेक कलाकृतींचे प्रदर्शन ट्राईब छत्री कलादालनात भरविण्यात आले आहे.
वॉक फॉर खादी : ‘ला-क्लासे’ फॅशन शोने जिंकली मने पुणे : सूर्यदत्ता ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूटच्या सूर्यदत्ता इन्स्टिट्यूट ऑफ फॅशन टेक्नॉलॉजीतर्फे आयोजित ‘ला क्लासे’ फॅशन शो नुकताच पार पडला. राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या १५०व्या जयंती वर्षानिमित्त राष्ट्राचा आणि खादीचा सन्मान वाढविण्याच्या उद्देशाने ‘वॉक फॉर खादी : द नेशन्स प्राइड’ या संकल्पनेवर विद्यार्थ्यांनी
पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात बी. पी. सिंग, विक्रम गोखले यांचा विशेष सन्मान पुणे : अनेक हिंदी मालिकांचे दिग्दर्शक असलेले बी. पी. सिंग आणि ज्येष्ठ अभिनेते विक्रम गोखले यांना भारतीय चित्रपटसृष्टीसाठी दिलेल्या अद्वितीय योगदानाबद्दल १८व्या पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात ‘पिफ डिस्टिंग्विश्ड अॅवॉर्ड’ हा विशेष पुरस्कार प्रदान करून गौरविण्यात येणार आहे. ज्येष्ठ संगीत दिग्दर्शिका उषा खन्ना यांना या वर्षीचा ‘एस

Is something wrong?
ठिकाण निवडा
किंवा

Select Feeds (Section / Topic / City / Area / Author etc.)
+
ही लिंक शेअर करा
व्यक्ती आणि वल्ली स्त्री-शक्ती कलाकारी दिनमणी
Select Language